scorecardresearch

दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ

दहावी परीक्षेच्या ‘गणित भाग एक’ विषयाची प्रश्नपत्रिका एका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे.

दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ
दहावीची गणिताची प्रश्नपत्रिका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : दहावी परीक्षेच्या ‘गणित भाग एक’ विषयाची प्रश्नपत्रिका एका महिला सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा पेपर फुटल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मनीषा कांबळे, असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात हा प्रकार घडला. याप्रकरणी या महिला सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे; राज्य कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा; काळ्या फिती लावून कामकाज

हेही वाचा – पुणे : संपाचा मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना फटका; पुण्यातील महसुलात घट

गुरुवारी (१६ मार्च) गणित भाग एक या विषयाची परीक्षा होती. यावेळी सुरक्षारक्षक मनीषा कांबळे हिने परीक्षा दालनामध्ये जाऊन प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षा दालनामध्ये मोबाईल वापराची बंदी असताना हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 13:13 IST