पिंपरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लिंकरोड पत्राशेड येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातील ‘इ’ इमारतीतील १११ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत काढण्यात आली. त्यांना घराचा ताबा देण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, कार्यालय अधीक्षक विष्णू भाट यावेळी उपस्थित होते. घरकुलाच्या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत आहे. लाभार्थींच्या जीवनात यामुळे मोठा बदल होणार आहे. या घरांमध्ये येणारी पिढी तयार होणार असून त्यांना चांगले आयुष्य लाभेल असे काम करा. हक्काचे व स्वतःचे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, घराचा वापर स्वतः करावा, सदनिकेची स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका भाड्याने देऊ नये अथवा विक्री करू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी केले.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
The forts in the state are in the grip of private encroachments Pune
राज्यातील किल्ले खासगी अतिक्रमणांच्या विळख्यात… आता होणार काय?
mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!

हेही वाचा – कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती; दीड एकर जागा महापालिकेच्या ताब्यात

हेही वाचा – पुणे: दांडिया खेळताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार

नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थेसाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी अध्यक्षांचा अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. तसेच अनेक वर्षांच्या तपस्येचे फळ लाभार्थींना मिळत आहे. झोपडीपासून इमारतीपर्यंतचा प्रवास तुम्ही केला आहे. त्यामुळे हा जीवनातला खूप मोठा बदल आहे. तुमची येणारी पिढी या घरात राहणार आहे. त्यामुळे तुमच्यातही बदल होणे गरजेचे आहे.