पिंपरी- चिंचवड : बंधाऱ्यात पोहायला गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी दोन च्या सुमारास घडली. तरुण विष्णू गुप्ता अस मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. दोन ते तीन तासाच्या शोधकार्यानंतर तरुण चा मृतदेह वन्यजीव रक्षक मावळ टीम ला मिळाला आहे. तरुण बुडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुप्ता कुटुंब हे आज किन्हई बंधारा येथे मौज मजा करण्यासाठी गेलं होतं. गुप्ता कुटुंबातील सात जण पोहण्याचा आनंद घेत होत. त्यामध्ये तरुण चा देखील सहभाग होता. बंधाऱ्याच्या पाण्यात सर्व जण मस्ती करत होते. एकमेकांचा अंगावर पाणी उडवत होते. एक जण मोबाईल मध्ये हा क्षण कैद करत होत. याच दरम्यान तरुण ला दम लागल्याने काही कळायचा आत बुडाला. क्षणात आनंदी वातावरण दुःखात बदलून गेले. तरुण चा शोध सुरू केला. अखेर वन्यजीव रक्षक मावळ टीम ला पाचारण करण्यात आलं. देहूरोड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. दोन ते तीन तासाच्या शोधकार्यानंतर तरुण गुप्ता चा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. किवळे विकास नगर भागात गुप्ता यांचा आईस्क्रीम चा व्यवसाय आहे. अनिल आंद्रे, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अनिश गराडे, कुंदन भोसले, गणेश सोंडेकर आणि निलेश गराडे यांच्या टीम ने बुडालेल्या तरुण चा मृतदेह बाहेर काढला आहे.

“किन्हई बंधारा येथे याआधी ही अशा घटना घडल्या आहेत. नागरिकांनी स्वतः ची आणि मुलांची काळजी घेतली पाहिजे. बंधाऱ्यात पाण्याचा अंदाज येत नाही. बंधाऱ्याच्या खूप आत जाऊ नये”

विक्रम बनसोडे- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड पोलीस ठाणे</p>