पुण्यात एकाच दिवसात करोनाचे २३४ रुग्ण तर पिंपरीत १२९ रुग्ण

पुण्यात सहा जणांचा करोनामुळे मृत्यू

(संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरात दिवसभरात २३४ करोना बाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर १ लाख ७६ हजार ४६२ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून ४ हजार ५८७ मृतांची संख्या झाली. त्याच दरम्यान ३०६ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर १ लाख ६६ हजार ८५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२९ करोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून १२९ जण करोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एक ही मृत्यू नाही. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९५ हजार ५६३ वर पोहचली असून पैकी, ९२ हजार ८३ जण करोनातून ठणठणीत बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ७५२ एवढी आहे अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 234 new corona cases in pune and 129 new cases in pimpri scj 81 svk 88 kjp

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या