पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील २९ गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, चंदननगर, खराडी, वाघाली, लोणीकंद परिसरातील २६ सराइतांना, तर परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.
परिमंडळ चारमधील तडीपार केलेल्या गुंडांची नावे पुढीलप्रमाणे – शिवाजी लक्ष्मण रामावत (वय ३० रा.लमाणतांडा,पाषाण), सचिन अशोक रणपिसे (वय २० रा. लक्ष्मीनगर, येरवडा), सुरज उर्फ किल्या वैâलास बाणेकर (वय ३५ रा. येरवडा), मोहम्मद उर्फ रहिम रहेमान शेख (वय १९ रा. येरवडा), सलमान चाँदबाशा शेख (वय ३० रा. वाघोली) महेश बलभिम सरोदे (वय २२ रा. येरवडा) सुंदर उर्फ कुबड्या राजाराम मेत्रोळ (वय ३५ रा. पर्णकुटी येरवडा), नंदकुमार संजय पासंगे (वय २२ रा. कामराजनगर येरवडा) आशा सिताराम राठोड (वय ४८, रा. येरवडा) शांताबाई गोविंद राठोड (वय ५० रा. नाईकनगर, येरवडा) नीता सुनील नगरकर (वय ६३ रा. वडगावशेरी) गणेश प्रकाश जाधव (वय १९ रा. बाणेर) प्रेम विकी ससाणे (वय १९ रा. येरवडा) मानकीबाई कमलेश चव्हाण (वय ५० रा. येरवडा), सोनीबाई बासू राठोड (वय ६०, येरवडा) मुन्नीबाई रेड्डी राठोड (वय ५० रा. नाईकनगर, येरवडा)
अंबु राजू धोत्रे (वय ४९ रा. गोखलेनगर) गणेश उत्तम वाघमारे (वय २२ रा. चंदननगर) निलेश राहूल वाघमारे (वय २५ रा. थिटे वस्ती, खराडी) सत्यम राजू चमरे (वय २४ रा. पेरणे, हवेली) मोहम्मद हुसेन खान (वय २२ रा. गाडीतळ, येरवडा) गोपाळ संजय यादव (वय २६ रा. बकोरी रोड, वाघोली), शशि पांडू चव्हाण (वय ४२ रा. नाईकनगर, येरवडा) मोहन बागीवान जाधव (वय ४१ रा. जनवाडी, गोखलेनगर) हबीब इबालु इराणी (वय २३ रा. इराणीवस्ती, शिवाजीनगर) कमल सुभाष चव्हाण (वय ३६ रा. नाईकनगर, येरवडा)
१०० सराइतांवर नजर
परिमंडळ चारच्या हद्दीतील १०० हून अधिक सराइतांच्या हालचालीवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्यांच्याविरूद्धही लवकरच प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे. तडीपार केलेले आरोपी पुन्हा शहरात आल्यास त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कात्रजमधील तीन गुंड तडीपार
कात्रज भागातील तीन सराईत गुन्हेगारांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. अभय उर्फ सोन्या अशोक निसर्गंध (वय २०, रा. सिद्धीविनायक कॉलनी, आंबेगाव खुर्द), विनोद दिलीप धरतीमगर (वय २२, रा. आंबेगाव बुद्रुक), प्रथमेश उर्फ अभय देविदास कुडले (वय २१, रा. दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. तिघांना पुणे शहर, जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. तिघांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी तयार केला होता.