लहानगा युवान मशीनला झोका घेत असताना मशीन अंगावर पडलं

पिंपरी-चिंचवडमध्ये सहा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आईच्या सोबत थांबलेल्या सहा वर्षीय मुलाला मृत्यू ने हिरावून नेलं आहे. युवान दौंडकर असं मृत्यू झालेल्या मुलाच नाव आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. युवानची आई वॉशिंग सेंटरवर गाडी धुण्यासाठी आली. तेव्हा शेजारीच असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात बसल्या असताना युवान अचानक लोखंडी रॉडवर ठेवलेली ग्रँडर मशीन सोबत झोका (लोंम्बकळत) असताना मशीन थेट तोंडावर पडले यात त्याचा मृत्यू झाला आहे. मशीनचे वजन २० ते ३० किलो असल्याच दुकानातील कामगारांनी सांगितलं आहे. 

पाहा व्हिडीओ –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार युवान दौंडकर हा सहा वर्षीय मुलगा त्याच्या आईसह वॉशिंग सेंटरवर आला होता. आई शेजारी असलेल्या गीता स्टील अँड फॅब्रिकेशनच्या दुकानात खुर्चीवर होती, युवान तिथंच त्यांच्या समोर खेळत होता. तेव्हा लोखंडी रॉडवर ठेवलेल्या मोठ्या ग्रँडर मशीनला झोका घेण्याच्या प्रयत्न केला. मशीन हे थेट युवानच्या तोंडावर पडले, काही कळायच्या आत घटना घडल्याने युवानला बेशुद्ध अवस्थेत आईने उचलले तात्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं, तिथं त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळं दौंडकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निष्काळजीपणा केल्या प्रकरणी दुकान मालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांनी दिली आहे.