नारायणगाव : श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन २०२५ ते २०३० सालासाठी २१ जागांसाठी ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनील शेळके यांनी दिली.

श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे.आज दि १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. उमेदवारी अर्ज शेवटच्या दिवशी-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ऊस उत्पादक प्रतिनिधी जुन्नर (१) गटातून – अशोक भगवंत घोलप, देवेंद्र लक्ष्मण खिल्लारी,देवराम सखाराम लांडे, शिवम कैलास घोलप, अविनाश किसन पुंडे
  • उत्पादक सभासद प्रतिनिधी शिरोली बु (२) या गटातून- विद्यमान चेअरमन सत्यशील सोपान शेरकर ,जालिंदर दिगंबर ढोमसे ,प्रमोद केरभाऊ खांडगे ,विठ्ठलराव बजाभाऊ कदम , रहेमान अब्बास मोमीन इनामदार, संतोष बबन खैरे ,सुधीर महादू खोकराळे, प्रवीण गुलाबराव डेरे .
  • ऊस उत्पादक सभासद ओतूर (३)गटातून – संजय रेवजी शेटे ,धनंजय आनंदराव डुंबरे ,बाळासाहेब पांडुरंग घुले ,पंकज शिवाजी वामन ,रामदास गणपत वेठेकर,मधुकर कृष्णाजी येंधे.
  • उत्पादक सभासद पिंपळवंडी (४)गटातून – अंबादास मुरलीधर हांडे, संभाजी गजानन पोखरकर, धनंजय दत्तात्रय लेंडे, संजय मारुती भुजबळ, मंगेश शिवाजी हांडे, प्रकाश रामचंद्र डावखर, नंदकुमार आनंदराव हांडे, रमेश हरिभाऊ हांडे, बबन मारुती गुंजाळ, शरद वामन चौधरी, अशोक लक्ष्मण हांडे, माणिक बाळशिरम हांडे, विवेक विठ्ठलराव काकडे, विलास रामजी दांगट, प्रकाश कुशाबा जाधव, जयवंत बाळासाहेब घोडके , नामदेव गंगाराम शिंदे.
  • उत्पादक सर्वप्रथम घोडेगाव (५)गटातून – नामदेव कुशाबा पोखरकर, मार्तंड तुकाराम टाव्हरे, दत्तात्रय भाऊसाहेब निघोट, यशराज अजित काळे, नामदेव काशिनाथ थोरात ,दत्तात्रय जिजाबा थोरात.
  • अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून- देवराम सखाराम लांडे ,विलास होनाजीराव रावते , प्रकाश दगडू सरोगदे, चंद्रकांत मोघाजी तळपे.
  • महिला राखीव प्रतिनिधी गटातून – सविता लक्ष्मण शिंदे, सुरेखा दिलीप गांजाळे, नीलम विलास तांबे, पल्लवी मंगेश डोके ,संगीता विजय घोडके.
  • इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून- विजयकुमार किसनराव आहेर ,निलेश नामदेव भुजबळ, भगवान नाथा घोलप, बाळासाहेब लक्ष्मण नलावडे , गणेश मारुती भुजबळ ,गंगाराम गेनभाऊ लोखंडे ,हर्षद रमेश हांडे ,रमेश हरिभाऊ हांडे ,रहमान अब्बाज मोमीन इनामदार ,रमेश विश्वनाथ भुजबळ, सुरेश भिमाजी गडगे ,हेमंत शंकर कोल्हे.
  • भटक्या विमुक्त जाती व जमाती / विशेष मागास प्रवर्गातील गटातून -बाबाजी यदु लोखंडे ,संजय विठ्ठल खेडकर ,शंकर रामभाऊ साळवे यांनी अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्यावर एकूण २१ संचालक निवडून द्यायचे आहेत.त्यासाठी सुमारे ६८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची आज दि १४ फेब्रुवारी अंतिम वेळ होती. दि १७ फेब्रुवारीला छाननी करून दि १८ ला नामनिर्देशन उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल व दि १८ ते ४ मार्च पर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात येणार आहे. दि ५ मार्चला निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. मतदान १५ मार्च व मतमोजणी दि १६ मार्च होणार आहे.