पुणे : जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी रविवारी शांतेतमध्ये मतदान झाले. सरपंच आणि सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी ६५१ मतदान केंद्रांवर रविवारी सरासरी ८१ टक्के मतदान झाले. निवडणुकीसाठी १ हजार २२९ उमेदवार रिंगणात असून निवडणुकीसाठीची मतमोजणी मंगळवारी (२० डिसेंबर) होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक मतदान मुळशीमध्ये झाले असून ८५.८२ टक्के मतदान झाले. भोरमध्ये ८५.०५ टक्के, बारामतीमध्ये ८४.९३टक्के तर दौंड ८३.९४ टक्के मतदान  झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. एकूण मतदारांपैकी १ लाख १८ हजार २४४ महिलांनी तर १ लाख २६ हजार ९२१ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा >>> पुणे: जिल्ह्यातील १७६ ग्रामपंचायतीसाठी शांततेत मतदान; मंगळवारी मतमोजणी

जिल्ह्यातील १२ तालुक्‍यातील १७६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ३ लाख ३ हजार ५८९ मतदार आहेत. त्यापैकी रविवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत २ लाख ४५ हजार १६६मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानासाठी मतदान केंद्रांवर सकाळपासून गर्दी झाली होती. सकाळी साडे सात वाजता मतदानास सुरुवात झाली. सायंकाळी  साडेपाच वाजता मतदानाची प्रक्रिया संपली. दुपारी साडेतीन पर्यंत ७१ टक्के मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर  शेवटच्या दोन तासात दहा टक्के मतदान झाले, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> आतंकवादाचा जिहादी चेहरा लपविण्यासाठी हिंदू दहशतवादाची खोटी संकल्पना; लेखिका स्मिता मिश्रा यांचा दावा

वेल्हे तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीसाठी ८४.९० टक्के, भोर तालुक्यातील ३० ग्रामपंचायतींसाठी ८५.०८ टक्के, दौंड तालुक्यातील आठ ग्रापंचायतीसाठी ८३.९४ टक्के, बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीसाठी ८४.९३ टक्के, इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसांठी ८३.७१ टक्के मतदान झाले. तर जुन्नर तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी ८३.५२, आंबेगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसांठी ७५.८९ टक्के, खेडमधील २१ ग्रामपंचायतींसाठी ७२.११ टक्के, शिरूरमधील ४ ग्रामपंचायतींसाठी ८४.०६ टक्के मतदान झाले. तसेच मावळ मधील ८ ग्रामपंचायतींसाठी ८९.६१ मुळशीतील ५ ग्रामपंचायतींसाठी ८५.८२ तर हवेली तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींसाठी ७५.५६ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 81 percent polling for the 176 gram panchayats in the district highest polling in mulshi pune print news apk 13 ysh
First published on: 18-12-2022 at 22:34 IST