लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत राज्यभरात घेण्यात आलेल्या ‘पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात ९२.६८ टक्के नवसाक्षर उत्तीर्ण झाले असून, ७.३२ टक्के नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

योजना संचालनालयाच्या संचालक महेश पालकर यांनी निकालाची माहिती दिली. केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियानाची राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयामार्फत अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अंतर्गत १७ मार्च रोजी राज्यभरात नवसाक्षरांचे पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान तपासण्यासाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ६ लाख ४१ हजार ८१६ नवसाक्षरांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या ४ लाख ५९ हजार ५३३ नवसाक्षरांपैकी ४ लाख २५ हजार ९०६ नवसाक्षर उत्तीर्ण झाले. तर ३३ हजार ६२७ नवसाक्षरांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचा शेरा देण्यात आला आहे. हा निकाल राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेच्या (एनआयओएस) संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला.

आणखी वाचा-बारामती मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या १५० हून अधिक तक्रारी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परीक्षेसाठी सर्वाधिक नोंदणी झालेल्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्ह्यातून ४० हजार ७१०, गडचिरोली जिल्ह्यातून ३३ हजार ७८७, चंद्रपूर जिल्ह्यातून २६ हजार ७६९, अमरावती जिल्ह्यातून २५ हजार ३२०, नाशिक जिल्ह्यातून २५ हजार २१५, अकोला जिल्ह्यातून १९ हजार ७२६ नवसाक्षरांनी नोंदणी केली होती.