लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी प्रथम वर्ष प्रवेशासाठीची ‘एमएचटी-सीईटी’ ही प्रवेश परीक्षा मंगळवारपासून राज्यभरात सुरू झाली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) गटासाठीच्या परीक्षेला ९३.९५ टक्‍के विद्यार्थी उपस्थित होते.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येत आहे. राज्यभरातील १७७ केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात पीसीएम गटासाठीची परीक्षा ९ ते १४ मे या कालावधीत होणार आहे. सीईटीच्या सकाळ आणि दुपार दोन्ही सत्रात मिळून एकूण ५७ हजार १२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५३ हजार ६६३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, अशी माहिती अशी माहिती राज्य सीईटी सेलने दिली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (पीसीबी) गटासाठीची परीक्षा १५ ते २० मे या कालावधीत होणार आहे.