पुणे: एनआयबीएम रस्त्यावरील दोराबजी मॉलसमोर ४० फूट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या मुलीची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याची घटना नुकतीच घडली. जवानांनी तातडीने प्रयत्न करुन मुलीला बाहेर काढले.

इनसीया इसाक इडतवाला (वय १६, रा. कोणार्कपूरम, कोंढवा) असे बचावलेल्या मुलीचे नाव आहे. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर दोराबजी माॅलसमोर पाण्याच्या तीन मोठ्या टाक्या बांधलेल्या आहेत. त्यापैकी रिकाम्या असणाऱ्या एका ४० फूट खोल टाकीमध्ये इनसिया पडली. स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलातील अधिकारी कैलास शिंदे, जवान अनिकेत गोगावले दोरी आणि शिडीच्या सहायाने टाकीत उतरले.

हेही वाचा… तलाठी भरतीत ‘पेसा’चा पेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इनसीया उंचावरुन पडल्याने तिला दुखापत झाली होती. टाकीत अंधार होता. जवानांनी तिला धीर दिला. दोर आणि शिडीचा वापर करुन तिला बाहेर काढले. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मुलीची तातडीने सुटका केल्याने तिचे प्राण बचावले असून, जवानांच्या कामगिरीचे कौतुक स्थानिक नागरिकांनी केले.