पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती होऊन झालेल्या भीषण स्फोटात दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी एक वाजेच्या सुमारास पिंपळे गुरव परिसरात घडली आहे. जखमी तरुणांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुमार दिलीप सुकराम आणि रमेश अशी जखमी तरुणांची नावं आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे गुरव परिसरात मोरया पार्क येथे कुमार आणि रमेश हे दोन्ही तरुण खोली करून राहतात. आज दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक त्यांच्या खोलीमधील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोट अत्यंत भीषण असल्याने भींतीला तडे गेले आहेत, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले. तर, खिडक्यांच्या काचा देखील फुटल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेत दोघे तरुण गंभीर भाजले असून त्यांना तातडीने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हे दोघे ही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असल्याचं सांगवी पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे करत आहेत.