पिंपरी- चिंचवडमध्ये पोलीस पुत्राने भरधाव कारने रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला जोरात धडक दिली आहे. या घटनेमध्ये महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून यात कार ने जोरात धडक दिल्याचं स्पष्ट दिसत आहे. कार चालक पोलीस पुत्र विनय विलास नाईकरे वय- २३ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीवाराम तेजाराम चौधरी यांनी याबाबत तक्रार दिली असून पोलीस पुत्राला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला कार ने जोरात धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सुदैवाने या घटनेत महिला बचावली असून जखमी झाली आहे. महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. २४ तासानंतर या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार चालक विनय याच्यावर भा.द.वी कलम 279,337,338 मोटार वाहन कायदा 182,119/177 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.