पुण्यातील वर्दळीचा भाग असलेल्या स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स बस चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने बसमधील महिलेला पळवून नेलं आणि तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नवनाथ शिवाजी भोग याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पती,पत्नी काम शोधण्यासाठी पुण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्वारगेट एसटी स्टँड परिसरात झोपण्यासाठी ते जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने दांपत्याला माझ्या बसमध्ये झोपा, एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार असं सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवून दोघे बसमध्ये आराम करण्यासाठी गेले.

पीडित महिलेचा पती लघुशंकेसाठी बसमधून खाली उतरला असता आरोपीने संधी साधत बस दुसरीकडे नेली. ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारुन टाकेन’ अशी धमकी त्याने महिलेला दिली. यानंतर स्वारगेटजवळ फुटपाथच्या बाजूला बस थांबून त्याने महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर कात्रज बसस्टॉप जवळील कॅनॉल फुटपाथच्या बाजूला बस थांबवून पुन्हा बलात्कार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर आरोपीने महिलेला बसमधून खाली उतरवलं आणि तेथून पसार झाला. पीडित महिलेने स्वारगेटमध्ये तक्रार दिल्यानंतर आम्ही ट्रॅव्हल्स चालकविरोधात गुन्हा दाखल केला. त्या आरोपीला बंगळुरु हायवेवर जेरबंद करण्यात यश आल्याचं पोलिसांनी सांगितलं.