भोसरीमध्ये दुकानात शिरून महिला व्यवसायिकेची हत्या; आरोपी फरार

गळ्यावर वार झाले असतांना महिलेने केला होता आरोपीचा पाठलाग

भोसरीमध्ये दुकानात शिरून महिला व्यवसायिकेची हत्या; आरोपी फरार

पिंपरी-चिंचवडमध्ये एका महिला व्यावसायिकेचा गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास भोसरी परिसरात घडली आहे. पूजा देवी प्रसाद (वय-३२) असं हत्या झालेल्या महिला व्यवसायिकेचे नाव आहे. मयत पुजाचं ‘प्रगती कलेक्शन’ नावाचं दुकान असून तिथं आज सकाळी ही घटना घडली आहे. भोसरी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पूजाने साडेनऊच्या सुमारास दुकान उघडलं, दुकानातील साफसफाई केली. काही वेळातच दहाच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दुकानात प्रवेश करत पूजाच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्यांच्यात झटापट झाली, पूजाने हल्ला केलेल्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्नही केला, दुकानाबाहेर जात काही अंतर पाठलागही केला. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने पूजा दुकानाबाहेर कोसळली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पुजाला रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. हत्येचे कारण अजुन स्पष् झालेलं नाही. पुजाचं कुटुंब गेली २० ते २५ वर्ष भोसरी परिसरात राहत आहे. हल्ला केलेल्या व्यक्तीचा भोसरी पोलीस शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : वाढदिवसाच्या दिवशी तरुणाला मारहाण करुन लुटले ; संगमवाडी पुलावर घटना
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी