scorecardresearch

पिंपरी: फ्लॅट खरेदीत महिलेची एक कोटींची फसवणूक ; हिंजवडीत १३ जणांवर गुन्हा दाखल

फ्लॅट खरेदी करताना एक कोटी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने हिंजवडी पोलिसांकडे केली आहे.

पिंपरी: फ्लॅट खरेदीत महिलेची एक कोटींची फसवणूक ; हिंजवडीत १३ जणांवर गुन्हा दाखल
( संग्रहित छायचित्र )

फ्लॅट खरेदी करताना एक कोटी रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका महिलेने हिंजवडी पोलिसांकडे केली आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पिंपरी चिंचवड : शंभर खोके मातोश्री ओके , ठाकरे- पवार चोर है अशा घोषणा देत वेदांता- फॉक्सकॉनवरून भाजप आक्रमक

याप्रकरणी सदर महिलेने हिंजवडी पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यानुसार, सुहास लुंकड, मिलींद लुंकड, संजय लुंकड, दीपक भटेवरा, मयूर पाटील, राजीव गंभीर, प्रशांत गाढवे, विजय मुरकुटे, व्यवस्थापक काळे आणि दोन महिला, एक अनोळखी पेंटर व एक अनोळखी दुचाकीस्वार अशा १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> पुणे : महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी तलावात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बनावट नकाशा तयार करून फ्लॅटखरेदीत फिर्यादी महिलेची एक कोटी तीन लाख रूपयांची फसवणूक केली. याबाबत जाब विचारला म्हणून दोन आरोपींनी सदर महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक खारगे तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या