पुणे : उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने विशेष गाडी सोडण्याचे नियोजन केले आहे. पुणे – मुजफ्फरपूर ही वातानुकूलित विशेष गाडी २० ते २७ डिसेंबरदरम्यान चालविण्यात येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे – मुजफ्फरपूर सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्सप्रेस २१ डिसेंबरला पुण्यातून रात्री ९ वाजता सुटेल. ती २३ डिसेंबरला सकाळी ६ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल. ही गाडी पुण्यातून २८ डिसेंबरला रात्री ९ वाजता सुटेल. ती ३० डिसेंबरला सकाळी ६ वाजता मुजफ्फरपूर येथे पोहोचेल. याचबरोबर ही गाडी मुजफ्फरपूर येथून २० डिसेंबरला दुपारी १ वाजता सुटेल. ती २१ डिसेंबरला रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचेल. ही गाडी मुजफ्फरपूर येथून २७ डिसेंबरला दुपारी १ वाजता सुटेल आणि २८ डिसेंबरला रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचेल.

हेही वाचा – कवींनी निर्भयपणे बोलले पाहिजे : डॉ. कुमार विश्वास

हेही वाचा – पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

या गाडीला दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा , दानापुर, पाटलीपुत्र आणि हाजीपुर हे थांबे आहेत. ही गाडी वातानुकूलित असून, तिला २० डबे असतील. या गाडीचे आरक्षण सर्व आरक्षण केंद्रे आणि http://www.irctc.co.in संकेतस्थळावर सुरू होईल. या गाड्यांची माहिती, थांबे आणि वेळापत्रक याची माहिती http://www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर अथवा एनटीईएस उपयोजनाचा वापर करून मिळवता येईल. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ac railway trains from pune to north india pune print news stj 05 ssb
First published on: 18-12-2023 at 17:13 IST