शिरुर :  गणेगाव खालसा  ,ता. शिरूर जि. पुणे येथे ११ फेबृवारी २०२५  रोजी रात्री ऊस तोडणी करिता आलेला कामगार माऊली उर्फ झालेश्वर आत्माराम गांगुर्डे रा. दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव  यांची पत्नी मिनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे वय २७ वर्ष यांनी नाशिक येथे त्यांचे नातेवाईकांचे लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून  मीनाबाई यांना  रस्सीने लोखंडी बाजेला बांधून गळा आवळून  खून केला होता.याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्या दाखल होता. खून केल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून फरार झाला . आरोपीचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीसांपुढे होते . सदरचा प्रकार हा गंभीर असल्याने  पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी  या गुन्ह्यातील आरोपीस पकडण्या करीता सुचना दिल्या.

त्यानुसार पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ तीन वेगवेगळी पथके तयार केली. या  पथकांनी आरोपीचा मलठण, पिंपरी दुमाला तसेच परीसरातील साखर कारखाने, तसेच कारखान्याचा  आजूबाजूला असलेल्या ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांकडे शोध घेतला. तसेच संगमनेर , कोपरगाव , श्रीगोंदा येथे जाउन पोलीस पथकाने तेथील ऊस तोडणी कामगारांचे कडे, हॉटेल व्यवसायिकांकडे व काही शेतक-यांकडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून येत नव्हता. त्यानंतर पोलीस पथकांनी आरोपीचा शोध हा पाचोरा जि .जळगाव, तसेच आरोपीचे मूळ गावी दडपिंपरी ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे जाऊन शोध घेतला परंतु कोणते धागेदौरे  पोलीसाच्या हाती लागत नव्हते, तसेच दौंड  भागातील उसाचे गु-हाळा वर जाउन तेथिल उसतोड कामगांरा कडे आरोपीचा शोध घेतला परंतु आरोपी मिळून आला नव्हता.

आरोपीचा शोध सुरू असताना  १२ मार्च २०२५ रोजी पोलिसांना आरोपी हा त्याचे मूळ गावी तडपिपंरी ता चाळीसगाव जि जळगाव येथे येणार असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने  लागलीच पोलीस निरीक्षक महादेव वायमोडे यांनी सहाय्यक  फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस  हवालदार संतोष औटी, पो काँ प्रविण पिठले. पो .काँ .योगेश पुंड यांचे एक पथक त्याचे मूळ गावी पाठवले, पोलीस आरोपीच्या गावात वेषांतर करून सापळा लावून बसलेले असताना आरोपी लपत छपत त्याच्या गावात येत असताना पोलिसांनी त्यास शिताफीने   ताब्यात घेऊन अटक केली .आरोपी हा गुन्हा केल्या पासून फरार होता तो मोबाईल वापरत नसल्याने त्याला अटक करण्याचे पोलीसाना आव्हान होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.