राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती झालेले अभिनेते आर. माधवन यांनी पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच विद्यार्थी, संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आदिवासींसह विविध समाजघटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली.

हेही वाचा >>> डॉ. प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबर रोजी निर्णयाची शक्यता, सरकार पक्षाला म्हणणे मांडण्याचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आर. माधवन अभिनेता म्हणून तमीळ, तेलुगू, कन्नड, हिंदी चित्रपसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत आहेत. शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित ‘रॉकेट्री’ या चित्रपटासाठी नुकताच त्यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. त्यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर माधवन यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात संस्था, कामकाज, अभ्यासक्रमा, सोयीसुविधांचा आढावा घेतला. नियामक परिषद, विद्या परिषद, स्थायी वित्त समितीचे अध्यक्ष म्हणून बैठका घेतल्या. त्यात त्यांनी अभ्यासक्रमांची रचना समजून घेण्यासाठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी विभागाच्या प्रमुखांशी संवाद साधला. तर विद्यार्थ्यांच्या अपेक्षाही जाणून घेतल्या. संस्थेत उपलब्ध असलेल्या सुविधांचे, तसेच मुक्त शिक्षण केंद्राच्या माध्यमातून देशभरात राबवलेल्या लघु अभ्यासक्रमांचे कौतुक केले. चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी लहान मुलांसारखा उत्साह टिकवून ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण उत्साहच सर्जनशीलता आणि उत्कृष्टतेसाठीची प्रेरक शक्ती असल्याचे मत माधवन यांनी मांडले.