ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी ६६ कोटींची पुरवणी मागणी येत्या विधिमंडळ अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे. तसेच गावपातळीपर्यंत ग्रंथालय पोहोचवण्यासाठी नवीन ग्रंथालयाचे अर्ज स्वीकारण्यास मंजुरी देण्यात आली असून लवकरच अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.

हेही वाचा >>>पुणे: ग्रंथालयांच्या अनुदानवाढीसाठी ६६ कोटींची पुरवणी मागणी; चंद्रकांत पाटील यांची माहिती

उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे घोले रस्ता येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात पुणे जिल्हा ग्रंथोत्सव-२०२२ च्या समारोपावेळी पाटील बोलत होते. राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, उपायुक्त राजेंद्र मुठे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाहक सोपानराव पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, की ग्रंथालयांना साहित्यविषयक कार्यक्रमांसाठी अनुदान देण्याचा विचार आहे. ग्रंथालयांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रंथ खरेदीसाठी निधी देण्यात येईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन आणि इतर खर्च त्यांना अनुदानातून भागवता येईल, सार्वजनिक ग्रंथालयांच्या वर्ग बदलाच्या बाबतीत सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>>पुणे: शहरात १ हजार ७०० ई-चार्जिंग पाॅईंट्स प्रस्तावित

आधुनिक काळात कितीही प्रगती करून ग्रंथांना विसरलो, तर आपल्याला मागे यावे लागेल. इतरांपर्यंत विचार पोहोचवण्याची प्रकिया सुरू राहण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्त्वाचे असल्याचे डॉ. मोरे यांनी सांगितले.