सांधेदुखी हा काही वर्षांपूर्वीपर्यंत केवळ ज्येष्ठ नागरिकांमध्ये आढळणारा त्रास आता सर्व वयातील व्यक्तींमध्ये दिसून येत आहे. विशेषत: करोना साथरोगानंतर घरातून काम, हालचालींचा अभाव यांमुळे आता तरुण वयातील रुग्णही सांधेदुखीच्या त्रासाला सामोरे जात आहेत. चांगली जीवनशैली असलेल्या व्यक्तींनाही अस्थि आणि सांध्यांचे त्रास जाणवत आहेत, त्यामुळे लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष नको, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वसाधारणपणे २० ते ४० वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये सध्या सांधे आणि हाडांच्या तक्रारींचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. संधिवात, सांध्यांभोवताली जळजळ, लठ्ठपणा, सांध्यांना झालेली दुखापत, फायब्रोमायल्जिया आणि ऑस्टिओपोरोसिस हे काही प्रकार चिंताजनक आहेत.करोना साथरोगानंतर घरातून काम करण्याचा वाढता कल, जास्त चरबीयुक्त आणि कृत्रिम शर्करायुक्त आहार यांमुळे सांधेदुखीच्या तक्रारी वाढत आहेत. सांधे सुजणे, लाल होणे, सतत दुखणे आणि ताप येणे ही तरुणांमध्ये आढळणारी काही प्रमुख लक्षणे आहेत, अशी माहिती अपोलो स्पेक्ट्रा रुग्णालयाचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. विश्वजित चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा : पुणे : स्वप्नमहालातील हलत्या झोपाळ्यावर मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची होणार प्रतिष्ठापना

लोकमान्य रुग्णालयाचे अस्थिशल्य विशारद डॉ. आशिष सूर्यवंशी म्हणाले,की हाडे कमकुवत होतात, त्यांची झीज होते तेव्हा संधिवात आणि ऑस्टिओपोरॉसिससारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. टेंडिनाइटिस, हाडांची जळजळ, हाडे किंवा सांध्यांचा संसर्ग, सांध्यांची झीज, कर्करोग, मुडदूस, ड जीवनसत्त्वाची कमतरता यांमुळे सांधेदुखीला निमंत्रण मिळते. तरुण पुरुषांपेक्षा तरुण स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे.

हेही वाचा : पुणे : धूम्रपान करणाऱ्यांच्या सहवासातील व्यक्तींना कर्करोगाचा धोका सर्वाधिक

काय काळजी घ्यावी?

आहारात दूध, दुग्धजन्य पदार्थ, सुकामेवा, तेलबिया, मासे आणि हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

ड जीवनसत्त्वासाठी कोवळ्या सूर्यप्रकाशात काही वेळ घालवा.

नियमित व्यायाम आणि चौरस आहाराला प्राधान्य द्या.

व्यायाम करताना दुखापत होऊ नये म्हणून व्यायामापूर्वी स्ट्रेचिंग करा.

सौम्य वेदना असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे, कोमट पाण्याने सांधे शेकणे, हलका व्यायाम
(फिजिओथेरपी) घेण्यास प्राधान्य द्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After corona join pais increasing in youth for pune pune print news tmb 01
First published on: 26-08-2022 at 11:13 IST