पुणे : राज्यावर असलेले ढगाळ हवामान कमी होऊन शनिवार, दोन डिसेंबरपासून वातावरण कोरडे होण्यास सुरुवात होईल. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाचा परिणाम म्हणून सोमवार, चार डिसेंबरपासून विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवेची चक्रिय स्थिती ईशान्य अरबी समुद्रात कायम आहे. उत्तर महाराष्ट्रावर असलेली हवेची द्रोणीय स्थिती मध्य प्रदेशकडे सरकली आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रुपातंर होऊन वायव्य दिशेने वाटचाल करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शनिवारपासून राज्याच्या अन्य भागांत हवामान कोरडे राहील. पण हवेत आद्रर्ता असल्यामुळे किमान तापमानात लगेच घट होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा… ‘एनडीए’च्या दीक्षान्त संचलनात महिला बटालियन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा… पिंपरी : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची कार्यालये समोरासमोर

उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. ढगाळ हवामानामुळे विदर्भातील किमान तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. शुक्रवारी राज्यात सर्वांत कमी १६.८ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे झाली आहे.