राष्ट्रवादी काँग्रसचे नेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नावाची घोषणा केलीय. पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची, तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची एकमताने निवड करण्यात आलीय, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. निवडीच्या वेळी अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी निवड झालेल्यांना पारदर्शक कारभार करण्यास सांगितलं असल्याचंही नमूद केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “१९९१ पासून माझा आणि दिलीप वळसे पाटील यांचा पुणे जिल्हा बँकेशी संबंध आला आहे. तेव्हापासून आम्ही संचालक म्हणून काम करतो. वास्तविक यावेळी आम्ही दोघेही उभे राहणार नव्हतो. परंतु काही कारणाने, नाईलाजास्तव आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. एकंदरीतच आम्ही अर्ज केला नसता तर बारामती आणि आंबेगावमध्ये एकमत झालं नसतं. आम्हाला तिथं एकवाक्यता ठेवायची होती. मी बराच प्रयत्न केला पण त्याला यश आलं नाही. पुणे जिल्हा बँक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे चांगलं संचालक मंडळ यावं आणि चांगलं काम व्हावं अशी भावना होती. म्हणून आम्ही ती निवडणूक लढवली.”

Sunil Tatkare, property,
सुनील तटकरे यांच्याकडे १४ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
, Buldhana, case registered, congress party, rahul bondre, violation of code of conduct
बुलढाणा: ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्षासह ११ जणांवर गुन्हे दाखल
Nominate BJP for Dharashiv Delegation demands to Devendra Fadnavis
धाराशिवसाठी भाजपालाच उमेदवारी द्या! शिष्टमंडळाची फडणवीस यांच्याकडे मागणी

“अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली”

“एखाद्या जागेचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूक लढवली. सगळे एका विचाराचे लोक निवडून आले आहेत. आज आम्ही पुरंदर तालुक्यातून निवडून आलेल्या दिगंबर दुर्गाडे यांना चेअरमन म्हणून संधी दिली आहे. व्हाईस चेअरमन म्हणून पहिल्यांदा बँकेत निवडून आलेले सुनील चांदेरे यांची निवड केली. चांदेरे हे मुळशी तालुक्यातील अ वर्गाचं प्रतिनिधित्व करतात. दिगंबर दुर्गाडे ड वर्गाचं ओबीसी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. सर्वांनी या दोघांना संधी देण्याचं काम एकमताने केलं,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

“आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक”

अजित पवार पुढे म्हणाले, “या दोघांवरही मोठी जबाबदारी आहे. आता बँका चालवणं आधीच्या तुलनेत स्पर्धात्मक झालं आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारची नियमावली येते. त्या नियमावलीचं तंतोतंत पालन करून शेतकऱ्यांना, सहकारी संस्था, पतसंस्थांना कर्जपुरवठा करायचा असतो. हा कर्ज पुरवठा करताना दिगंबर दुर्गाडे आणि सुनील चांदेरे दोघेही या नियमांचा विचार करतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे.”

हेही वाचा : राष्ट्रवादीला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले, “मला खासदार…”

“आम्ही निवड झालेल्यांना पारदर्शक कारभार करायला सांगितलं आहे. कुठेही चुकीच्या गोष्टी करता कामा नये. खास बात तर अजिबात करता कामा नये. कागदांची पुर्तता आणि धोरणात बसत असेल तर कोणत्याही गटातटाचा, जातीधर्माचा असो त्याला मदत झाली पाहिजे. हीच अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा बँकेची परंपरा आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.