बारामती लोकसभेवरून अजित पवार गट विरुद्ध माजी मंत्री विजय शिवतारे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दुसरीकडे विजय शिवतारे हे अजित पवारांवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. अजित पवारांवरील टीकेला मावळमधील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर देत विजय शिवतारे यांनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून जाऊ न देण्याचा थेट इशारा दिला आहे. मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकवटले होते, यावेळी त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली.

हेही वाचा >>> पिंपरी : समाविष्ट गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार, चिखलीत जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बारामती लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री विजय शिवतारे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी तशी इच्छादेखील व्यक्त केलेली आहे. मात्र, महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रचार करण्यासदेखील सुरुवात केली आहे. असं असलं तरी विजय शिवतारे मात्र बारामती लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. ते बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे. गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून शिवतारे हे आक्रमक झाले असून थेट अजित पवारांवर टीका करत आहेत. यावर अद्याप अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक झाले असून मावळमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवतारे यांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून न जाऊ देण्याचा इशारा दिला आहे. आम्ही महायुतीचा धर्म पाळत आहोत. आम्हाला अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार महायुतीचा धर्म पाळत आहोत. मात्र, शिवतारे हे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेत असून त्यांना आम्ही जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.