पिंपरी- चिंचवड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पिंपरी- चिंचवड दौरा आहे. शहरातील विविध भागातील ३५ पेक्षा अधिक गणेश मंडळांना अजित पवार भेट देणार आहेत. दुपारी साडेबारा ते रात्री दहा पर्यंत अजित पवारांचा दौरा असेल. गुरुवारी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ अजित पवार यांनी शहरात हजेरी लावली होती. आता स्वतः अजित पवार यांचा दौरा आहे.

आगामी महानगर पालिका निवडणुका डोळ्या समोर ठेऊन अजित पवारांनी पिंपरी- चिंचवड शहराचा दौरा सुरू केला आहे. शहरातील ३५ पेक्षा अधिक गणेश मंडळांना धावती भेट देणार आहेत. दुपारी साडेबारा पासून सुरू होणारा दौरा रात्री दहा पर्यंत असणार आहे. अजित पवारांना पुन्हा एकदा आपली पकड असलेला बालेकिल्ला मिळवायचा असल्याने अतोनात प्रयत्न करत आहेत. शहरात पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांनी ही लक्ष घातलेल आहे. शहरात अजित पवारांचा दौरा असल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. दुपारपासून रात्री दहापर्यंत असलेले अजित पवार यांच्यामुळे पोलिसांची मात्र दमछाक होईल असे दिसत आहे.

शहरातील आझाद मित्र मंडळ, सुवर्ण मित्र मंडळ, अमर दीप मित्र मंडळ, सौंदर्य मित्र मंडळ, सागर तरुण मित्र मंडळ, शिवाजी उदय मित्र मंडळ, मोरया मित्र मंडळ, गांधी पेठ तालीम मित्र मंडळ, समर्थ कॉलनी मित्र मंडळ, शिप्रताप मित्र मंडळ, पवना मित्र मंडळ, श्रीकृष्ण मित्र मंडळ, शिव छत्रपती मित्र मंडळ अशा एकूण ३५ पेक्षा अधिक गणेश मंडळांना अजित पवार भेट देणार आहेत. आगामी महानगर पालिका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय नेते कामाला लागले आहेत. पैकी, अजित पवार हे महायुतीचे महत्वाचे घटक आहेत. पुन्हा एकदा पिंपरी- चिंचवड महानगर पालिका मिळवायची असल्यास अजित पवार नेमकी एकला चलो ची भूमिका घेतात की? भाजपच्या स्थानिक नेत्यांना सोबत जुळवून घेऊन आगामी महानगर पालिका लढवतात हे पाहणं महत्वाचं आहे.