माजी खासदार, भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केली होती. यावरून निलेश राणे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लक्ष्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रात निलेश राणे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून आंदोलनही करण्यात येत आहे. यावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्यातील राजकीय पक्षांना सल्ला दिला आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

निलेश राणे नेमकं काय म्हणाले?

“मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्माबाबत चिंता वाटावी अशी स्थिती,” असं विधान शरद पवार यांनी केलं होतं. यावर निलेश राणे यांनी शरद पवार यांची तुलना औरंगाजेबरोबर केली होती.

हेही वाचा : “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा…”, संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

“इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम…”

याबद्दल अजित पवार यांना प्रसारमाध्यमांनी विचारल्यावर ते म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा मंगलकलश आणून मुख्यमंत्रीपद सांभाळलं. तेव्हापासून अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्रीपद सांभाळल्याचं आपण पाहिलं आहे. पण, इतके गलिच्छ पद्धतीने बोलण्याचं काम काही राजकीय पक्षाचे लोक करत आहेत. त्यांना बोलता येत इतरांना बोलता येत नाही का?,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.

हेही वाचा : “सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड…”, शरद पवारांना आलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“…तर महाराष्ट्राला बदनाम करण्याची गोष्ट आहे”

“राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेते, प्रवक्ते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची गरज नाही. असेच होत राहिलं, तर महाराष्ट्राला बदनाम करण्याची गोष्ट आहे,” अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.