विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा तसेच शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांशी याबाबत चर्चादेखील केली आहे. दरम्यान याच पोटनिवडणुकीवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे कारण नाही. लोकशाही आहे, असे अजित पवार स्पष्टपणे म्हणाले आहेत. ते आज (५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> सत्यजीत तांबेंच्या आरोपांनंतर छगन भुजबळांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले “शरद पवारांनी अगोदरच…”

Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
amol kolhe marathi news, shivajirao adhalarao patil marathi news
“उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शिवाजी आढळराव पाटील पराभूत झाले!”, ‘त्या’ विधानावरून अमोल कोल्हेंचा टोला
Ajit Pawar, khadakwasla, Baramati lok sabha,
बारामतीच्या निकालाची ‘खडकवासल्या’वर भिस्त!… अजित पवारांनी दिली कबुली
abhijeet bichukale and udayanraje bhosale
साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात; उमेदवारी अर्जाबाबत म्हणाले, “मी एकटा…”

निवडणूक बिनविरोध होईल हे डोक्यातून काढावे

“ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचे काही कारण नाही. त्यांनी कोल्हापूर, पंढरपूर, देगलूर येथील पोटनिवडणूक बिनविरोध होऊ दिली नव्हती. मुंबई येथील अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार दिला नाही, म्हणजे बाकीच्या सर्व निवडणुका बिनविरोध होतील हे त्यांनी डोक्यातून काढावं. शेवटी लोकशाही आहे. जनता ज्यांना निवडून द्यायचे, त्यांना निवडून देईल,” असे अजित पवार म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> “बाळासाहेब थोरातांनी आता बोललं पाहिजे,” सत्यजीत तांबेंच्या आरोपानंतर भुजबळांचे विधान; म्हणाले, “काय घडलं हे फक्त…”

पोटनिवडणूक बिनविरोध व्हावा, एकनाथ शिंदेंचे आवाहन

दुरसीकडे कसबा पेठ आणि चिंचवड या जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. त्यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांशी याबाबत बातचित केली आहे. “अनेक ठिकाणी आमदारांचे दुखद निधन होते. त्यानंतर त्या जागेवरील पोटनिवडणुकीमध्ये विरोधक आपला उमेदवार उभा करत नाहीत. तेथील निवडणूक बिनविरोध केली जाते. तशी परंपरा आहे. अंधेरीमध्येही नुकतेच पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीसाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन दिले होते. त्यांच्या या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला होता. त्यानंतर अंधेरी येथील निवडणूक बिनविरोध झाली होती. हीच परंपर सर्वांनी जपावी म्हणूनच चिंचवड, कसबा येथील पोटनिवडणुकीसाठी मी त्यांना विनंती केली आहे,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.