पिंपरी : बॅंके संदर्भातील कायदे कठोर झाले आहेत. अनेक बँकेला टाळे लागले आहे. अनेकांचे पैसे बुडाले. काही बॅंकांचे वाटोळे झाले आणि संपूर्ण संचालक मंडळ तुरुंगात आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) वाटोळे केले तर विद्यमान संचालक तुरुंगात जातील. आपण बाहेर राहू, त्यामुळेच मी बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच आता डोळ्यात तेल घालून  बँका चालवाव्या लागणार आहेत, असेही ते म्हणाले. 

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वाकड शाखेच्या स्थलांतर समारंभाप्रसंगी पवार बाेलत हाेते. बॅंकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक सुनिल चांदेरे यावेळी उपस्थित हाेते. सांगली जिल्ह्यातील एका बँकेच्या उद्घाटनाचा दाखला देत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, की बॅंकेचे उद्घाटन केल्यानंतर मोटारीत बसल्यानंतर संबंधित बँकेला लवकरच टाळे लागणार, असे मी शरद पवार यांना म्हणालो. त्यावर तुला वेड लागले आहे का, काहीही कसा बोलत असतो. ते इतकी मोठी लोक असताना कशी बुडणार बँक? असे ते मला म्हणाले. परंतु, आज या बँकेला टाळे लागले आहे. सध्या चुकीच्या कामासाठी लोकांकडून दबाव आणला जातो. तुमच्या बापाची बॅंक आहे का म्हणतात,  आमच्या बापाची नाही पण दबाव आणणाऱ्याच्या बापाचीही नाही. काही लाेक एवढे बोलतात की सालकरी गडीही बाेलून घेत नाही, असले काही तरी ऐकावे लागते. त्यासाठी डाेळ्यात तेल घालून बॅंका चालवाव्या लागणार आहेत.

हेही वाचा >>>अन्नधान्य व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी बंद स्थगित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाेकसभेला शेतकऱ्यांनी कंबरडे मोडले

अलीकडे तरुणांचा कल शेतीकडे वाढल्याचे आणि टोपीवाले शेतकरी रोडावल्याचे दिसून येते. परिषदेलाही टोपीवाले मोजकेच शेतकरी दिसले. मी टोपीवाल्या शेतकऱ्यांना दोष देत नाही. मला टोपीवाले आणि बिन टोपीवाल्या शेतकऱ्यांची ही गरज आहे.  लाेकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांनी आमचे कंबरडे माेडल्याचे पवार म्हणाले. वाकड येथील महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या ६४ व्या द्राक्ष परिषदेच्या सांगता समारंभावेळी ते बोलत होते.  महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या अध्यक्षपदी कैलास भोसले यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.