लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: प्रशांत जगताप यांना खासदार होण्यासाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. पुणे लोकसभेचा उमेदवार घटक पक्ष एकत्र बसून ठरवू. मात्र, नवा चेहरा दिल्यास जनताही त्याला पसंत करते, अशा मोजक्या शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रथमत पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत सूचक संदेश शुक्रवारी दिला.

खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. या जागेवर काँग्रेसकडून आधीच दावा करण्यात आला आहे. मात्र, राष्च्रवादीकडून अद्याप अधिकृत, ठोस भाष्य कोणी केले नव्हते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी भावी खासदार म्हणून शुभेच्छा फलक लागले आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे भाष्य केले. पवार म्हणाले, प्रशांतच्या मनात काय आहे, हे आधी जाणून घेतो. मग माझ्या मनातले सांगतो. प्रशांत माझा कार्यकर्ता आहे. राष्ट्रवादीने त्याला आजवर विविध पदे दिली आहेत.

हेही वाचा… पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आठ टन गोमांस पकडले; टेम्पोत कांदा आणि बटाट्याच्या आड गोमांस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे जिल्ह्यात पुणे, मावळ, शिरूर, बारामती असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी कोणत्या लोकसभा मतदारसंघात की राज्यसभा खासदार म्हणून प्रशांत इच्छुक आहे ठाऊक नाही. पुण्याच्या जागेबाबत आघाडीचे पक्ष एकत्र बसून चर्चा करू. नवा चेहरा दिल्यास जनताही पसंत करते, असा अनुभव आहे, असेही ते म्हणाले.