scorecardresearch

कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपाला दिलेल्या पाठिंब्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आता आम्हाला…”

कसबा पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे.

ajit pawar
कसबा पोटनिवडणुकीत मनसेने भाजपाला दिलेल्या पाठिंब्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया (संग्रहित छायाचित्र)

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर पोटनिवडणुक जाहीर झाली असून भाजपाकडून हेमंत रासने,तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर उमेदवार आहेत. ही पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत मनसेने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शवला आहे. या पाठिंब्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मनसेला खोचक टोला लगावला आहे. “अरे बापरे एवढ्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिला. आमचे धाबेच दणाणले. आता आम्हाला फार काळजी घ्यावी लागेल, अशा शब्दात मनसेवर पवारांना निशाणा साधला.

हेही वाचा- पुणेकरांवर वाढीव ‘मिळकत कराची’ टांगती तलवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून फ्लेक्स लागले. त्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की,आपल्याला काही त्रास होतो का ? आमच्या एखाद्या सहकाऱ्याला कार्यकर्ते उत्साहाने म्हणत असतील.तर त्यामध्ये बिघडल कुठे,राजकीय जीवनात काम करित असताना. प्रत्येकच काहीना काही स्वप्न असतात.कार्यकर्त्यांला देखील आपल्या प्रदेशाध्यक्ष बद्दल वाटल असेल असेही पवार म्हणाले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 23:20 IST