किरकोळ कौटुंबिक वादातून न्यायालयात घटस्फाेटाचे दावे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक वादाची झळ एका निवृत्त न्यायाधीशाच्या विवाहित मुलीला बसली. तिच्या पतीने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला. या प्रकरणात दाखल केलेल्या पोटगीचा दावा न्यायालयाने मान्य करुन निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीस दरमहा १५ हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली.
हेही वाचा >>>पुणे: बस प्रवासात ओळख झालेल्या तरुणीवर बलात्कार, खासगी VIDEO व्हायरल करण्याची धमकी देत उकळले १६ लाख
या प्रकरणात निवृत्त न्यायाधीशांची मुलीने तिच्या वकिलांमार्फत कौटुंबिक न्यायालायात अर्ज सादर केला होता. तिने दाखल केलेल्या पोटगी अर्जावर सुनावणी झाली. ॲड. चंद्रसेन कुमकर, ॲड. निलेश वाघमाेडे यांनी तिच्या वतीने बाजू मांडली. त्यांना ॲड. महेश देशमुख आणि ॲड. दानिश पठाण यांनी सहाय केले. कौटुंबिक न्यायालायने युक्तीवाद मान्य करुन तिला दरमहा १५ हजार रुपये अंतरिम पोटगी मंजूर केली.
किरकोळ वादातून कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटांचे अर्ज दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. किरकोळ वाद सामोपचाराने मिटवणे गरजेचे आहे. कौटुंबिक वादाला निवृत्त न्यायाधीशांच्या मुलीला सामोरे जावे लागले, अशी माहिती वकिलांनी दिली.