पुणे : कारागृह व सुधारसेवाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी अमिताभ गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे. मुंबईतील विशेष शाखेचे अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांची पुणे शहर अतिरिक्त पोलीस आयुक्त (पूर्व) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची दोन दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था मुंबई येथे बदली करण्यात आली होती. त्यांची पुन्हा पुण्यात बदली झाली आहे.कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Dec 2022 रोजी प्रकाशित
अमिताभ गुप्ता यांची राज्य कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात पोलीस सह आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
पुणे

First published on: 18-12-2022 at 13:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh gupta appointed as additional director general of police state prisons pune print news tmb 01