पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली होणार अशी चर्चा अनेक दिवसांपासून अधिकारी वर्गामध्ये पाहण्यास मिळाली. मात्र आजअखेर डॉ. के. व्यंकटेशम यांची बदली, विशेष अभियान महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आता पुणे शहराच्या पोलीस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहराचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये सूत्रे हाती घेतली होती. तेव्हा पासून आजअखेर नागरिकांच्या  हिताच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवून, पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढविण्याचे काम त्यांच्या या कार्यकाळात केले गेले आहे. या अनेक उपक्रमाचे पुणेकर नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे. तर आता डॉ. के. व्यंकटेशम यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे ग्रामीण अधीक्षक पदी अभिनव देशमुख

पुणे ग्रामीण अधीक्षक संदीप पाटील यांची गडचिरोली मध्ये बदली झाल्यावर त्यांच्या जागी कोण येणार अशी चर्चा सुरू असताना. आज कोल्हापूर पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची पुणे ग्रामीण अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amitabh gupta is the new police commissioner of pune city scj 81 svk
First published on: 17-09-2020 at 23:34 IST