पुणे : ‘मी स्टार प्रचारक हे आत्ताच कळलं’, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी केले. राहुल कलाटे यांच्या अपक्ष उमेदवारीसंदर्भात अजित पवार आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतल्यावर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाच चिंचवडमध्येही चुरस निर्माण झाली आहे. त्यातच या निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा >>> पुणे : सुगंधी लाल द्राक्षाचे नवे वाण विकसित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हे म्हणाले की, या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी दिल्लीत होतो. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. अजित पवार आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतल्यावर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार? कसबा, चिंचवडमध्ये सभा घेण्याबाबत मला माहिती नाही. मी स्टार प्रचारक आहे, हे मला आत्ताच कळलं, असेही कोल्हे म्हणाले. भाजप प्रवेशाबाबत विचारले असता कोल्हे म्हणाले की, लोकशाहीमध्ये राजकारणाचा पोत बदलत चालला आहे. संसदेतील भाषणाबाबत अजूनही लोकांना प्रश्न पडत असेल तर माझे संसदेतील पूर्ण भाषण ऐकावे. माझ्या संसदेच्या भाषणात ‘कभी खुशी कभी गम’ आहे का, हे तुम्हाला कळेल.