व्यावसायिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. लक्ष्मी रस्त्यावरील एका कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र पीरप्पा कांबळे (वय ३६, रा. बुधवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी कांबळेचे साथीदार आकाश कासट, जमीर कदम यांच्यासह साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने आरोपींकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात व्यावसायिकाने आरोपींना एकूण १३ लाख ६२ हजार रुपये परत केले होते. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीकडे १३ लाख ५० हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्यावसायिक आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. व्यावसायिकाने याबाबत खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.
त्यानंतर खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून कांबळे याला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा – “…ते काम पूर्ण झालं असं भाजपाला वाटत असेल, म्हणून आता कोश्यारींना पदावरून हटवलं” नाना पटोलेंचा गंभीर आरोप!

हेही वाचा – “छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांचा भाजपाने कधी निषेध केला नाही”, जयंत पाटलांची टीका; म्हणाले, “त्यांना..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक निरीक्षक अभिजीत पाटील, मधुकर तुपसौंदर, हेमा ढेबे, रवींद्र फुलपगारे आदींनी ही कारवाई केली.