पर्यावरण संवर्धनासोबतच बदलत्या पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्याची संधी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सिंगापूर येथील ब्ल्यू प्लॅनेट स्किल या कंपनीसह सामंजस्य करार केला असून, त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाश्वत विकासाचे धडे देण्यात येणार आहेत.

हेही वाचा- नववर्षानिमित्त लोणावळ्यात कडक बंदोबस्त; हुल्लडबाजांवर कारवाईसाठी पथके

सामंजस्य करारावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र म्हस्के, डॉ. जुही देशमुख, ब्लू प्लॅनेटचे मुख्य कार्यकारी संचालक हर्ष मेहरोत्रा, कौशल्य विभागाचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गौर आदी या वेळी उपस्थित होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये पर्यावरणीय बदलांचा अभ्यास करण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच ‘शाश्वत विकास’ या विषयावर जी २० परिषद होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने या कराराच्या माध्यमातून पर्यावरण आणि शाश्वत विकासाच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

हेही वाचा- पुणे: कोथरूडमध्ये लोकसहभागातून पावसाळी चेंबरच्या झाकणांची दुरुस्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कराराच्या माध्यमातून विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाश्वत विकास, पुनर्वापर, हरित वाहतूक, हरित ऊर्जा, आरोग्य, जल संवर्धन, आरोग्य आणि सुरक्षा, आहारशास्त्र आदी विषयातील शिक्षण घेता येणार आहे. हे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेयांकांचा लाभ घेता येईल, असे डॉ. म्हस्के यांनी सांगितले.