पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ शनिवारी सायंकाळी पु्न्हा अपघात झाला. अवजड ट्रकने (कंटेनर) पाच वाहनांना धडक दिली. अपघातात चौघेजण जखमी झाले. भरधाव ट्रकने मोटारीला दीड किलोमीटर फरफटत नेले. सुदैवाने या घटनेत जिवीतहानी झाली नाही. अपघातानंतर या भागातील वाहतूक काळी काळ विस्कळीत झाली.

बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ  सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भरघाव कंटेनरने शिवशाही बसला धडक दिली. त्यानंतर कंटेनरने डंपर, टेम्पो, मोटारीला धडक दिली. मोटार सुमारे दीड किलोमीटर फरफटत नेली. अपघातानंतर वाहनचालक भयभीत झाले. वाहनचालक, तसेच नागरिकांनी कंटेनरचालकाला पाठलाग करुन पकडले. अपघातानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
Three died on the spot after speeding car hit container on Phaltan Pandharpur
फलटण पंढरपूर रस्त्यावर बरडजवळ अपघातात तीन ठार
without helmet officers and employees should be banned from pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी : हेल्मेट नसल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेत मज्जाव
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी

हेही वाचा >>>“प्रफुल पटेलांच्या घराचे किती मजले ईडीने का ताब्यात घेतले यावर…”; शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले…

वाहतूक पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहायाने बाजूला काढण्यात आली. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाले. अपघातात चौघेजण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.नवले पूल परिसरात अपघातांचे सत्र कायम आहे. बहुतांश अपघात भरधाव वेगामुळे झाले असून, ११ नोव्हेंबर राेजी अवजड कंटेनरने चार ते पाच वाहनांना धडक दिली. अपघातात चालकाचा मृत्यू झाला होता.