शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील घटना घटना

पुणे : बलात्काराच्या गुन्ह्याची तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहाजवळ ही घटना घडली.

demand of thirty thousand bribes Three people in a trap with city planner
तीस हजार लाचेची मागणी; नगर रचनाकारासह तिघे सापळ्यात
dharashiv, Talathi, bribe,
धाराशिव : लाच मागणारा तलाठी गजाआड, लाचलुचपत विभागाची कारवाई, गुन्हा दाखल
Ghatkopar hoarding collapse marathi news
फलक लावण्यात येणाऱ्या जागेच्या स्थैर्याचा मुद्दा दुर्लक्षितच, घाटकोपरच्या घटनेनंतर मुद्दा उपस्थित
Ghatkopar incident
Hording Collapse : घाटकोपर दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली, महाकाय होर्डिंग उचलण्याचे काम सुरूच; VIDEO समोर!
How To Divide Work in 24 Hours To Stay Away From Diabetes
२००० लोकांच्या निरीक्षणातून तज्ज्ञांनी मांडलं आजार टाळण्याचं सूत्र; २४ तासांचे व कामाचे विभाजन कसं करावं, पाहा वेळापत्रक
pune traffic jam, pune murlidhar mohol, murlidhar mohol traffic jam marathi news
पुण्यातील वाहतूक सुरळीत करण्याचा ‘संकल्प’ सोडणारे स्वतः कोंडीत अडकतात तेव्हा…
man jumps into lake after being fed up with expenses of daughters treatment
मुलीच्या उपचाराच्या खर्चाला कंटाळून पित्याची तलावात उडी; वेळीच दोन पोलिसांनी…
Nitesh Rane, High Court, Nitesh Rane latest news,
वडिलांच्या प्रचारात व्यग्र असल्याने उत्तर दाखल करण्यास मुदतवाढ द्या, नितेश राणेंची उच्च न्यायालयात मागणी

याबाबत एका ५० वर्षाच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत भगवान माने (वय ५३, रा. मधुबन सोसायटी, विजापूर रोड, सोलापूर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने सोलापूर येथील केगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात नियुक्तीस आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी ओळखीचे आहेत. चंद्रकांत माने हा पुण्यात नियुक्तीस होता. त्या वेळी त्याची फिर्यादी महिलेशी ओळख झाली होती. माने याने महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला.

हेही वाचा >>> पुणे: पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला पकडले; दांडेकर पूल भागात कारवाई

महिलेने २०२० मध्ये समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तसेच तिने सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्याविरोधात माने याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मानेने १७ फेब्रुवारी रोजी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तिला शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारातील उपहारगृहाजवळ बोलावले. बलात्काराची तक्रार मागे घे. तुला जीवे मारु, अशी धमकी त्याने महिलेला दिली. महिलेने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर माने याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक साळवे तपास करत आहेत.