पुणे : पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावरील सोने तस्करी केंद्रीय सीमाशुल्क विभागाच्या (कस्टम) पथकाने उघडकीस आणली. दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून ७३ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले. याप्रकरणी प्रवाशाविरुद्ध कस्टम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

दुबईहून आलेल्या विमानातून प्रवासी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरला. विमानतळाच्या आवारातून गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत प्रवासी होता. कस्टमच्या पथकाने प्रवाशाच्या हालचाली टिपल्या. प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. तपासणीत प्रवाशाने अंतर्वस्त्रात सोन्याची भुकटी प्लास्टिकच्या पिशवीत लपविली होती. कस्टमच्या पथकाने प्रवाशाकडून सोन्याची भुकटी जप्त केली असून, जप्त केलेल्या भुकटीची किंमत ७३ लाख रुपये आहे.

Shiv Panvel Highway, Accident, Accident on Shiv Panvel Highway, Ola App Passengers, Raises Safety Concerns, ola drivers, ola cab, marathi news, panvel news, panvel, accident news,
शीव-पनवेल महामार्गावरील रात्रीच्यावेळी प्रवास सुरक्षित आहे का ?
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
st mahamandal marathi news, st digital payment marathi news
सुट्ट्या पैशांच्या वादावर एसटीची डिजिटल पेमेंटची मात्रा, दररोज सहा हजार प्रवाशांकडून यूपीआयद्वारे तिकीट खरेदी
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा : “अगदी मुख्यमंत्री असले तरी कारागृहात बसवून पैसे…”, आदित्य ठाकरे यांच्या विधानाची चर्चा

दरम्यान, कस्टमच्या पथकाने १४ जानेवारी रोजी दुबईहून आलेल्या सोन्याच्या बांगड्या, परदेशी सिगारेट, चार किलो तंबाखू, अत्तरांच्या बाटल्या असा ११ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ११ जानेवारी रोजी दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून नऊ लाख ६४ हजार रुपयांचे सोने जप्त केले होते. प्रवाशाने पट्ट्याला सोन्याचे बक्कल लावल्याचे तपासणीत उघड झाले होते.