scorecardresearch

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार ; जनता वसाहत परिसरातील घटना

पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना जनता वसाहत परिसरात घडली.

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वार ; जनता वसाहत परिसरातील घटना
( संग्रहित छायचित्र )

पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना जनता वसाहत परिसरात घडली.शेखर मराठे (वय २७, रा. जनता वसाहत, पर्वती) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी तीन आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठेचा दोन महिन्यांपूर्वी ओंकार गायकवाड आणि त्याचा मामेभाऊ सुनील भोरडे यांच्याशी वाद झाला होता. आरोपींनी मराठेला जनता वसाहत परिसरातील गल्ली क्रमांक ५३ परिसरात अडवले. त्याला धमकावून पर्वती टेकडी परिसरात नेण्यात आले.

आरोपींनी मराठेवर कोयत्याने वार केले तसेच त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या