राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत निषेध नोंदवला. तसेच राज्यपालांनी माफी मागावी, अशी मागणी उचलून धरली. राज्यापालांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर आठवले म्हणतात, “माफी मागण्याची…”

“राज्यपाल हे खूप मोठं पद आहे. त्यांनी पदाचा गरीमा राखणं गरजेचं आहे. त्यांच्या बोलण्याच्या शब्दांवर ओळी, पुस्तक तयार होतात. राज्यपालांनी महापुरुषांबद्दल तुलनात्मक बोलणं हे अतिशय निंदनीय आहे. असा मूर्खपणा कोणी केला नसेल, असा त्यांनी केला आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. त्यांचं वाचन विचित्र पुस्तकांकडे गेले असेल कदाचित. आपण काय वाचतो आणि काय बोलतो, याबद्दलचं त्यांनी भान ठेवायला पाहिजे,” असा सल्ला बच्चू कडू यांनी दिला.

हा सगळा श्रेयवादाचा प्रकार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सुटकेबद्दल बोलतना कडू म्हणाले की, “केंद्रीय यंत्रणा सर्व करत आहेत. हे करणं सरकारचं कर्तव्य आहे. श्रेय घ्यायचं काय कारण आहे. एखादा तहानलेला माणूस आला आणि पाणी पाजलं. तेव्हा बोंबलत असेल की मी पाणी पाजलं हे योग्य नाही. श्रेय कुठं घेतलं पाहिजे आणि कुठं नाही, याचं भान असणं गरजेचं आहे,” असंही बच्चू कडू म्हणाले.