पुणे : बँक कर्मचाऱ्याने कात्रज घाटात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. रवी सोनवणे (वय ३६, रा. त्रिमूर्ती चौक, भारती विद्यापीठ) असे आत्महत्या केलेल्या बँक कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडला ४० वर्षांनंतर मंत्रिपद मिळणार? चंद्रकांत पाटील म्हणाले, ॲडव्हान्समध्ये…

हेही वाचा – ‘सवाई’च्या स्वरमंचावर तीन पिढ्यांचे सादरीकरण; महोत्सवात आश्वासक, बुजुर्ग कलाकारांचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवी एका खासगी बँकेत कामाला होते. ते दोन दिवसांपूर्वी घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. कात्रज घाटात झाडाला एका तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिासंना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावर चिठ्ठी सापडली. चिठ्ठीतील नावावरुन ओळख पटविण्यात आली. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे रवी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले होते. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, मुलगी असा परिवार आहे.