बारामती: बारामती शहरातील फलटण चौक ते कसबा चौक या रस्त्यावर डंपरची धडक बसल्याने हातात सायकल घेऊन चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता ही दुर्घटना घडली.
मारुती उमाजी पारसे (वय ७०, रा. आनंदनगर, गवारे फाटा, फलटण रोड, बारामती) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी राजनारायण बलजित सिंह (वय ४५, रा. चवदौर सीधी, मध्य प्रदेश) याला अटक केली आहे. याबाबत, सतीश मारुती पारसे (वय ३८, रा, आनंदनगर, गवारे फाटा, फलटण रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारसे हे हातात सायकल घेऊन पायी चालत जात असताना पाठीमागून फलटणकडून कसब्याकडे जाणाऱ्या डंपरची त्यांना धडक बसली. त्यामध्ये ते जागीच मृत्युमुखी पडले.