अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी असल्याचं सांगत एकाने पुण्यातील टेक्स्टाईल डिझायनर असलेल्या तरुणीकडून ९ लाख ६५ हजार रुपये उकळले आहेत. आरोपीचं नाव अमित चव्हाण असं असून, तो बारामती येथील रहिवाशी आहे. डेटिंग अॅपवर दोघांची भेट झाली होती. भेटीवेळी अमित चव्हाणने स्वतःची ओळख राहुल पाटील या नावाने करून दिली होती. तसंच आपण अमेरिकेत गुप्तचर अधिकारी असल्याचंही त्याने सांगितलं होतं. पोलिसांनी अमित चव्हाणला बारामतीतून बेड्या ठोकल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२८ वर्षीय टेक्स्टाईल डिझायनर तरुणीची डेटिंग अॅपवर चव्हाण याच्याशी ओळख झाली होती. मार्चमध्ये अॅपवर संपर्कात आल्यानंतर एप्रिलमध्ये ते दोघे भेटले होते. त्यावेळी अमित चव्हाणने स्वतःची ओळख राहुल पाटील या नावाने करून दिली होती. इतकंच नाही तर अमेरिकेत गुप्तचर अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचंही त्याने सांगितलं होतं.

आपल्या कार्यालयतून १५४ देशांचं काम चालतं आणि भारत माझ्या क्षेत्रात येत असून, एका तपासाच्या कामासाठी आपण इथे आलेलो असल्याचं अमित चव्हाणने तरुणीला भेटीवेळी सांगितलं. आपला फोन आणि लॅपटॉप फॉरमॅट करण्यासाठी दिलेला असून, तपास संस्थेकडून पाळत ठेवली जात असल्याचं त्याने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणीचा एक लाख रुपये किंमतीचा लॅपटॉप आरोपी घेऊन गेला, तो परत केलाच नाही.

हेही वाचा- BHR Scam : भाजपाच्या जळगावमधील आमदारावर पुण्यात गुन्हा दाखल

गुजरातमधील मित्रांकडून कमी किंमती टेक्स्टाईलसाठी लागणारा माल खरेदी करू देतो असं सांगून चव्हाणने तरुणीने व्यवसाय सुरू करण्यासाठी बचत केलेले पैसे घेतले. तरुणीने चव्हाणकडून वापरल्या जाणाऱ्या बँक खात्यात ८ लाख ३७ हजार रुपये जमा केले. पण, आपल्याला फसवलं गेलं असल्याचं तरुणीच्या लक्षात आलं आणि तिने सायबर पोलिसांत ३० जून रोजी तक्रार दिली. पुढे आरोपी बारामतीचा असल्याचं तपासातून निष्पक्ष झालं. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ३० वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण असं त्याचं पूर्ण नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात बारामती एमआयडीसी परिसरात राहतो.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baramati man dupes woman of rs 9 lakh intelligence officer in us govt amit chavan relationship app pune police bmh
First published on: 10-07-2021 at 09:53 IST