scorecardresearch

Premium

भिडे वाडा स्मारकाचा प्रश्न सुटला, सुप्रीम कोर्टातला खटला पुणे महापालिकेने जिंकला; चंद्रकांत पाटलांची माहिती

भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे.

bhide wada
भिडे वाड्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात जिथे देशातली मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्या भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. कारण, भिडे वाड्यासंदर्भातला सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला आहे. त्यामुळे लवकरच या शाळेच्या ठिकाणी स्मारक उभारलं जाईल. स्मारकाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

भिडे वाड्यासंदर्भातील वाद लवकर निकाली निघावा यासाठी त्या जागेचे मूळ मालक असलेल्या पुना मर्चंट बँकेचे चेअरमन विजय ढेरे यांच्याशी अलिकडेच चंद्रकांत पाटील यांनी चर्चा केली होती. भिडे वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता तेथे राष्ट्रीय स्मारक होणे महत्त्वाचे आहे. हे स्मारक राज्यातील नव्हे तर देशातील महिलांचे प्रेरणास्थान ठरणार असल्याने पुना मर्चंट बँकेने सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पाटील यांच्या आवाहनास ढेरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, बँकेचे सर्व सभासद आणि भाडेकरू यांच्याशी चर्चा करून सहकार्याची भूमिका घेण्याबाबत आश्वस्त केले होते.

players of Vidarbha
शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे होणार विदर्भातील खेळाडूंना फायदा
simhastha kumbh mela nashik marathi news, nashik dada bhuse marathi news, nashik kumba mela marahti news
नाशिक शहराचा प्रस्तावित वळण मार्ग विस्तारण्यास अडसर, सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आढावा बैठक
Mocking the unemployed
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून बेरोजगारांची थट्टा, घेतला ‘हा’ निर्णय
pune residents oppose monorail project marathi news, monorail project in thorat garden of kothrud marathi
कोथरूडमधील थोरात उद्यानात मोनोरेल; प्रकल्पाला पुणेकरांचा विरोध… जाणून घ्या कारण

हे ही वाचा >> “शासकीय जागेवर बिल्डरची नजर असतेच”, मीरा बोरवणकरांचा पुन्हा आरोप, म्हणाल्या…

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली. या भिडे वाड्याचं राष्ट्रीय स्मारक व्हावं, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. परंतु, हे प्रकरण न्यायालयात अडकलं होतं. आता या स्मारकासमोरचा न्यायालयीन पेच सुटला असून लवकरच भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bhide wada smarak issue resolved in supreme court pmc maha govt won case asc

First published on: 16-10-2023 at 18:31 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×