औरंगाबाद येथील कलावैभव संस्थेतर्फे दिला जाणारा ‘भीमसेन जोशी’ पुरस्कार पुण्यातील प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आझाद यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार १८ मे रोजी औरंगाबाद येथे देण्यात येणार आहे.
कलावैभव संस्थेतर्फे दरवर्षी पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘भीमसेन जोशी वंदना महोत्सवा’ चे आयोजन करण्यात येते. महोत्सवामध्ये एका ख्यातनाम कलाकाराला ‘भीमसेन जोशी’ पुरस्कार देण्यात येतो. पं. आझाद यांना याच महोत्सवामध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र आणि २५ हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पंडित अरविंदकुमार आझाद यांच्या अविरत संगीत सेवेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. ते गेली अनेक र्वष भारताबरोबरच परदेशातही तबला वादनाचे कार्यक्रम करत आहेत. त्यांचे तबला वादनाच्या क्षेत्रातील योगदान मोठे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2013 रोजी प्रकाशित
पंडित अरविंदकुमार आझाद यांना ‘भीमसेन जोशी पुरस्कार’ जाहीर
औरंगाबाद येथील कलावैभव संस्थेतर्फे दिला जाणारा ‘भीमसेन जोशी’ पुरस्कार पुण्यातील प्रसिद्ध तबलावादक पंडित अरविंदकुमार आझाद यांना जाहीर झाला आहे.
First published on: 16-05-2013 at 01:41 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhimsen joshi reward to pd arvindkumar aazad