पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे ३० एप्रिलला महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ही परीक्षा होणार आहे. याच परीक्षेची प्रवेशपत्रे समाजमाध्यमांत आल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर आता एमपीएससीने या परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

रविवारी (३० एप्रिल) संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ च्या आयोजनाच्या वेळी आयोगाकडून सर्व ३७ जिल्हाकेंद्रांवरील सर्व परीक्षा उपकेंद्रांवर सीसीटीव्ही चित्रीकरण करण्यासह सर्व उमेदवारांची उपस्थिती बायोमेट्रिक पध्दतीने नोंदविण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेचा प्रत्यक्ष कालावधी सुरु झाल्यानंतर ते संपेपर्यंत आपापसात कोणत्याही कारणास्तव बोलणे, कोणत्याही वस्तूंची देवाणघेवाण करणे, पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणे, परवानगी नसलेली कोणतीही वस्तू, साहित्य जवळ बाळगणे, परीक्षेच्या आयोजनात अडथळा आणणे आदी कृत्य गैरप्रकाराचा प्रयत्न समजण्यात येईल.

हेही वाचा… “शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच, अशा प्रकरणी आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांवर कारवाई करण्यात येईल. परीक्षेनंतर सर्व उपकेंद्रावरील सीसीटीव्ही चित्रिकरणाची तपासणी करण्यात येईल. सदर तपासणीमध्ये कोणताही उमेदवार आक्षेपार्ह वर्तन करत असल्याचे आढळून आल्यास अशा उमेदवारांवर परीक्षेतील गैरप्रकाराचा प्रयत्न समजून कारवाई करण्यात येईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले.