पुणे: भरधाव वेगात दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या कठड्याजवळील सिमेंटच्या ब्लॉकला धडकून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ नोव्हेंबर) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास वडगाव पुलावर घडली.    

तुळशीराम कोकया राठोड (वय ३६, रा. डहाणूकर कॉलनी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार सुनील चव्हाण (वय ३०) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा…  पुणे: बहिणीला भेटायला निघालेल्या भावाचा भरधाव डंपरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मयत तुळशीराम राठोड हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून दुचाकी भरधाव चालवत होता. वडगाव पुलावर मध्यभागी असणाऱ्या कठड्याजवळील सिमेंट ब्लॉकला स्वतः धडकून गंभीर जखमी होऊन स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत झाला. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुणगे तपास करत आहेत.