लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: आम्ही कोणताही पक्ष फोडलेला नाही, तेच इकडे आले आहेत. अजित पवार हे भारतीय जनता पार्टीत आले नाहीत. त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे. सिंचन घोटाळ्यातून पवार यांना कोणतीही क्लीन चीट देण्यात आला नाही. त्याबाबत चौकशी चालू असल्याचे भाजपचे सचिव, विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.

Pankaja Munde, Chhagan Bhujbal,
पंकजा मुंडे यांनी नाशिकऐवजी बीडमध्ये लक्ष द्यावे, छगन भुजबळ यांचा सल्ला
Sanjay Singh alleges that Arvind Kejriwal is not allowed to meet his family face to face
केजरीवाल यांचे नीतिधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न! कुटुंबीयांना समोरासमोर भेटू दिले जात नसल्याचा संजय सिंह यांचा आरोप
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
Vijay Shivtare
मुख्यमंत्र्याचं ऐकलं नाही, पण ओएसडींच्या फोननंतर शिवतारे नरमले; माघार घेण्याचे कारण सांगताना म्हणाले…

पिंपरीत पत्रकारांशी भारतीय बोलत होते. पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले उपस्थित होते.

आणखी वाचा-पुणे शहर कार्यालयाचे दरवाजे अजित पवार गटासाठी बंदच! ‘हे’ आहे कारण

अजित पवारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतला आहे. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते. निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा असेल तर तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते. अजित पवार यांनी जनतेच्या हितासाठी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे ,असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचे ठरते.

सरकारने २०१४ ते २०१९ या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीवर निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला होता. २०१९ ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते. त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले. तसेच सरकार सत्तेत आले असल्याचेही ते म्हणाले.