लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार असून २०० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र, जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. शिल्लक सेना ही ‘किंचित सेना’ होईल, या भीतीनेच ठाकरे गटाकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका होत असल्याची टीपण्णी त्यांनी केली.

Buldhana Lok Sabha, queueless voting,
बुलढाणा लोकसभा निवडणुकीत यंदा ‘रांगविरहित मतदान’! काय आहे योजना जाणून घ्या…
pune aimim, mim lok sabha candidate anis sundke pune
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षांत मुस्लिम, दलित समाजासाठी काय केले?”, एमआयएमचे उमेदवार अनिस सुंडकेंचा पलटवार
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
telugu desam party
“सत्तेत आल्यास उत्तम दर्जाचं मद्य, कमी किंमतीत उपलब्ध करून देऊ”, निवडणुकीपूर्वी चंद्राबाबू नायडूंचं मतदारांना आश्वासन

आगामी लोकसभा निवडणुकीत ४८ जागांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून ५१ टक्के मते मिळविण्याचा भाजपचा निर्धार आहे. विधानसभेत २०० हून अधिक जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. भाजपची बैठक निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून २०२४ मधील निवडणुकांसाठी हा महासंकल्प असेल. केंद्राच्या योजना पोहोचविण्यासाठी ‘घर घर अभियान” आणि शिंदे फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत केला जाईल. असेही ते म्हणाले.

आणखी वाचा-‘हनी ट्रॅप’ प्रकरणातील डॉ. कुरुलकर यांच्या RSS संबंधाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला…”

‘किंचित सेना’ होण्याची भीती…

मुंबई महापालिका जिंकण्याचा निर्धार भाजपने नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत केला आहे. शिल्लक सेना ही ‘किंचित सेना’ होईल, या भीतीनेच ठाकरे गटाकडून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टीका होत असल्याची टीपण्णी बावनकुळे यांनी केली.

मंत्रिपद देण्याच्या आमिषाने आमदारांकडे पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मात्र, भाजपचे कोणताही आमदार प्रलोभनांना बळी पडला नाही. उलट हा प्रकार हाणून पाडण्यात आला. मंत्रिपदासाठी भाजपचा कोणताही आमदार असा प्रकार करणार नाही असा विश्वास आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रभाग रचनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने याचिका दाखल केल्याने निवडणुका रखडल्या आहेत. महाविकास आघाडीने नियमबाह्य काम केले होते. ती चूक भाजपने सुधारली आहे, असे त्यांनी सांगितले. पुणे लोकसभेसाठी बापट कुटुंबियांकडून इच्छा व्यक्त होत आहे. इच्छा व्यक्त करणे गैर नाही. योग्य तो निर्णय घेतला जाईल. अद्याप पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. असेही ते म्हणाले.